⚡देवगड ता.१६-: रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड यांच्यावतीने देवगड शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गैरसोय होता नये यासाठी ग्रामीण रुग्णालय देवगड, स्टेट बँक व ब्राम्हणदेव मंदिर या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड यांच्यावतीने गेल्या दोन ते अडिज वर्षामध्ये गोरगरीब जनतेच्या दृष्टीकोनातून अनेक त्यांनी उपक्रम राबविले आहेत. तसेच देवगड तालुक्यातील अनेक समाजउपयोगी कार्यक्रम राबवून समाजहित जोपासण्याचे काम करीत आहेत. देवगड शहरामध्ये वरदळीच्या ठिकाणी व लहानमुले वृध्द स्त्रीया आसन व्यवस्थेची अत्यंत गरज होती हि गरज जाणून ग्रामीण रुग्णालय देवगडच्यासमोर,स्टेट बँक व ब्राम्हण मंदिराच्या समोर आसन व्यवस्था बसवून जनतेची गैरसोय दुर केली आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगडचे रोटरी प्रेसिडेंट प्रविण पोकळे,चार्टर्ड प्रेसिडेन्ट हनिफशेठ मेमन, दयानंद पाटील,अनुश्री पारकर,मनिषा डांबरी,नरेश डांबरी,अनिल कोरगावकर,गौरवशेठ पारकर,विजय बांदिवडेकर,अनिल गांधी उपस्थित होते.
फोटो- रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड यांच्यावतीने देवगड शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेली आसन व्यवस्था
