भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळाच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर…

⚡कणकवली ता.१६-: परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षणिक मंडळाच्यावतीने 7 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (5वी) व पूर्व माध्यमिक (8 वी) शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून पूर्व उच्च प्राथमिकमध्ये भडगाव हायस्कूलचा रूद्र पिकुळकर (266)गुण मिळवून प्रथम, सावंतवाडी नं.2 चा सोहम गावडे (264 ) गुण मिळवून द्वितीय व सावंतवाडी नं.4 ची वेदा राऊळ (254) गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेत कुडाळ हायस्कूलची युगा मयेकर व आरपीडी हायस्कूल सावंतवाडीचा योगेश जोशी (258 गुण) संयुक्त प्रथम क्रमांक, कळसुलकर हायस्कूलची मृणाली देसाई द्वितीय व दोडामार्ग हायस्कूलची चिन्मयी खानोलकर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. पाचवीमध्ये 21 विद्यार्थी व आठवीमध्ये 20 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले.
ही परीक्षा कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी व कणकवली कॉलेज या दोन केंद्रावरघेण्यात आली होती. पूर्व उच्च प्राथमिकसाठी मराठी माध्यम 389, इंग्रजी माध्यम 116 विद्यार्थी प्रविष्ठ होते, तसेच पूर्व माध्यमिकसाठी मराठी माध्यम 281 व इंग्रजी माध्यम 106 विद्यार्थी परीक्षेस बसले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असून गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात येईल.
या परीक्षेचा सविस्तर निकाल आज परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे उपलब्ध असेल. तसेच वॉटस्अ‍ॅप ग्रुपवरही पाठवण्यात येईल, निकालासाठी रावजी परब व सिध्देश कुळकर्णी सावंतवाडी आणि परमहंस भालचंद्र महाराज संस्थान’, विजय केळूसकर, गजानन उपरकर तसेच शैक्षणिक मंडळ सदस्यांशी संपर्क साधावा.
परीक्षा कामकाज यशस्वीतेसाठी गजानन उपरकर, अध्यक्ष शैक्षणिक मंडळ, विजय केळुसकर-व्यवस्थापक, परीक्षा प्रमुख सदानंद गावकर, शरद हिंदळेकर, प्रकाश प्ररब, काशिनाथ कसालकर, श्रीकृष्ण कांबळी, विष्णू सुतार, सुहास् आरोलकर, मंगेश तेली, किरण कोरगावकर, रावजी परब या शैक्षणिक मंडळ सदस्यांसह सिद्धेश कुळकर्णी, दिवाकर मुरकर, कणकवली कॉलेज, कळसुलकर हायस्कूल, डी.एड कॉलेज कणकवली, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
सविस्तर निकाल गुणानुक्रमे पुढील प्रमाणे- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी)- युगा मयेकर (258, कुडाळ हायस्कूल), योगेश जोशी (258, आरपीडी हायस्कूल सावंतवाडी), मृणाली देसाई (256, कळसुलकर सावंतवाडी), चिन्मयी खानोलकर (250, दोडामार्ग हायस्कूल), दिया सामंत (246, एस.एल.देसाई हाय.पाट), आर्या फाले (244, कळसुलकर हाय. सावंतवाडी), आरूष शेट्टी (242, पोदार कणकवली), कृष्णा पाष्टे (238, मिलाग्रीस सावंतवाडी), अनघा रावन (224, कळसुलकर हाय.सावंतवाडी), सुधांशू धुरी (222, कुडाळ हाय.), वेदांत बंड (220, पोदार कणकवली), आयुष परब (218, आरपीडी सावंतवाडी), सान्वी कारेकर (216, विद्यामंदिर कणकवली), स्वयंम महाडिक (212, एस.एल. देसाई, पाट), कृतिका सावंत (212, पोईप हाय.), आर्यन कुलकर्णी (210, वारगाव हाय.), अथर्व सावंत (210, कासार्डे हाय), सौमित्र मळेकर (210,एस.एल.देसाई पाट), गायत्री जोशी (210, एस.एल.देसाई पाट), चैतन्य दळवी (210, आयडीएल इंग्लिश स्कूूल),
पाचवी-रूद्र पिकुळकर (266, भडगाव हाय.) सोहम गावडे (264, सावंतवाडी नं. 2), वेदा राऊळ (254, सावंतवाडी नं.4), अवनी बावकर (248, सावंतवाडी नं.2), भार्गव पेडणेकर (248, एस.एल. देसाई पाट), योगी लेले (246, सावंतवाडी नं.2), सीया नाईक (244, इन्सुली नं. 5), अर्णव चुबे (244, भडगाव हाय.) प्रबध्द बर्डे (242, कुडाळ हाय.) अर्णव घाडीगावकक्षर (242, कुडाळ हाय.), वेदांत वाळके (242, कुडाळ हाय.), आरोही मेस्त्री (242, विद्यामंदिर कणकवली), उत्कर्ष आडारी (240, सावंतवाडी नं. 2), जिज्ञासा देसाई (240, सावंतवाडी नं.2), ओम हळवे (24(, कणकवली नं. 3, विघ्नेश मरळ (234, डॉन बॉस्को ओरोस), अनय घाडी (230, उसप नं.1), सान्वी सावंत (230, सावंतवाडी नं. 2), सावली नाईक (228, जि.प. बोडदे), पार्थ धुरी (228, कुडाळ हाय.), स्वरा नाईक (228, कुडाळ हायस्कूल)
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव अशोक सापळे, खजिनदार व विश्वस्त मंडळ सदस्य दादा नार्वेकर, व्यवस्थापक विजय केळुसकर, शैक्षणिक मंडळ सदस्य यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page