जगदीश दुधवडकर:अंमली पदार्थ विरोधी व्यसनाधीन दिन..
आंबोली,ता. सुख शांती आणि चांगले जीवन जगायचे असेल तर व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.सुरुवातीला मौजमजा म्हणून केलेली चूक नंतर काळ बनते.विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार अंगीकारून अशा गोष्टीपासून स्वतः ला दूर ठेवले पाहिजे.असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आंबोली पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना व्यसनाधीनताच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन करताना केले.
आंबोली पब्लिक स्कूल येथे अंमली पदार्थ विरोधी दिन भारताच्या भावी सुज्ञ नागरिकांसोबत विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी आंबोली पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक दुधवडकर,हवालदार दत्ता देसाई यांनी विद्यार्थ्याना व्यसनांमुळे होणारे परिणाम,कायद्याच्या तरतुदी,नागरिकांची कर्तव्ये,कायदेशीर मदत,तातडीची पोलीस मदत याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य विलास मोरे,मंगल मोरे,शिक्षक उपस्थित होते.यावेळी हवालदार दत्ता देसाई यांनीही व्यसनाधीन व्यक्तीच्या जीवनातील दुष्परिणामा बाबत मार्गदर्शन केले.
