लेखी आश्वासनाशिवाय रेल्वे टर्मिनल बाबतचे आंदोलन मागे नाही..

मंत्री केसरकारांकडून वेळ ढकलण्याचा प्रयत्न:
प्रवासी संघटनेच्या ऍड निंबाळकर यांनी भूमिका केली स्पष्ट…

⚡सावंतवाडी ता.१३-: रेल्वे टर्मिनल संदर्भात जो पर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आम्ही २६ जानेवारी रोजी पुकारलेले आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही मोठा प्रमाणात लढा उभारणार अशी भुमीका आज कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने अँड.संदीप निंबाळकर यांनी येथे मांडली.

दरम्यान मंत्री दिपक केसरकर यांनी आम्हाला फक्त तोंडी आश्वासन देऊन एक प्रकारे वेळ ढकलण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप देखील श्री निंबाळकर यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page