पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली पाण्याची टाकी झाडाझुडपाच्या विळख्यात…

तात्काळ सफसफाई करा:सौ. रिया येडवे यांनी केली मागणी…

⚡बांदा ता.१३-: बांदा बाजारपेठेला पाणीपुरवठा करणारी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली पाण्याची टाकी झाडाझुडपाच्या विळख्यात सापडली असून य टाकीची तात्काळ सफसफाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक दोनच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. रिया येडवे यांनी केली आहे.

या टाकीतून उभाबाजार व लगतच्या बाजारपेठेला पाणीपुरवठा करण्यात येतो. ही टाकी पोलीस ठाण्याच्या आवारात आहे. या टाकीवर झाडाझुडपाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून स्थानिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या टाकीची तातडीने साफसफाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page