पिंगुळी काळेपाणी येथील पेट्रोलपंपवर सीएनजीची सुविधा द्या …

रिक्षा युनियन कुडाळ यांची मागणी..

⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ शहरात सीएनजीधारक वाहनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कुडाळ शहरात ५०० रिक्षा असून यातील अधिकतर सीएनजीवर चालतात. मात्र, कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर असतानाही येथे असलेल्या पेट्रोलपंपवर सीएनजीची सोय नाही. यामुळे कुडाळमधील रिक्षाचालकांना ओरोस किंवा झाराप येथील सीएनजी पंपवर जावे लागते.

हे दोन्ही पंप मोठ्या अंतरावर असून येथे जाणे खर्चिक आहे. त्यामुळे कुडाळ शहरालागून ४ किमी अंतरावर असलेल्या पिंगुळी काळेपाणी येथील पेट्रोलपंपवर
सीएनजीची सुविधा द्यावी, अशी मागणी महानगर गॅस कंपनीकडे सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक – मालक संघटना, रिक्षा युनियन कुडाळ यांच्यामार्फत करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पिंगुळी काळेपाणी येथील पेट्रोलपंप चालकांना देण्यात आले. यावेळी पिंगुळी काळेपाणी येथील पेट्रोलपंप चालकांनी आपण सीएनजीची सुविधा देण्यास तयार आहोत, असे सांगितले. मात्र, याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, ही सुविधा पिंगुळी काळेपाणी पेट्रोलपंप येथे लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी रस्तारोको करण्यात येईल, असा इशारा रिक्षा युनियनकडून देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page