मळेवाड येथील धोकादायक रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक न ठेवल्यास मायनिंग वाहतूक रोखणार…

हेमंत मराठे:जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमाची पायमल्ली..

⚡सावंतवाडी ता.१३-: मळेवाड येथील धोकादायक व रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक न ठेवल्यास मायनिंग वाहतूक रोखणार असल्याचा इशारा मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.

कळणे मळेवाड रेडी व साटेली मळेवाड रेडी अशा दोन्ही ठिकाणची मायनिंग वाहतूक करणारी डंपर वाहतूक सुरू झाली असून सदरच्या ट्रान्सपोर्ट किंवा मायनिंग कंपनीने रहदारीच्या व धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवलेले नसल्याने अपघात होऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे.मायनिंग वाहतूक सुरू करत असताना धोकादायक व रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याचे जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमाची पायमल्ली सदरची कंपनी करत असून खनीकर्म अधिकारी याकडे उघड्या डोळ्यांनी डोळे झाक करत आहेत.तसेच मायनिंग सुरू करत असताना संबंधित गावातील ग्रामपंचायतीना कोणत्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही.यामुळे एक प्रकारे मायनिंग कंपनी ठेकेदार ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीने वागत आहेत.मळेवाड कोंडुरे हद्दीतील रहदारीच्या व धोकादायक ठिकाणी मायनिंग कंपनीकडून सुरक्षारक्षक न नेमल्यास मायनिंग डंपर वाहतूक रोखून धरणारअसल्याचा इशारा मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page