*💫मालवण दि.१७-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील प्रा. एम. आर. खोत व एन.सी.सी. विभागातील विद्यार्थ्यांनी कुंभारमाठ येथील हुतात्मा रेगे स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याठिकाणी साफसफाई केली. स्मारक तसेच पुतळे यांची देखभाल घेतली जावी व त्याठिकाणी होणारे गैरप्रकार थांबावेत या हेतूने हे समाजकार्य केल्याचे प्रा. खोत यांनी सांगितले. स्वातंत्र्यसैनिक तसेच थोर व्यक्तींची स्मारके व पुतळे हे सर्वांचे प्रेरणास्थान असतात व त्यांची प्रेरणा घेऊन आपण समाजकार्य केले पाहिजे. मात्र अलीकडे काही ठिकाणी अशा स्मारकांची देखभाल घेतली जात नाही. मात्र त्याठिकाणी दारू पिणे, पार्ट्या करणे, कचरा करणे हे प्रकार वाढत चालले आहेत. असे प्रकार हे समाजासाठी अशोभनीय असतात. असे प्रकार होऊ नये म्हणून स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील प्रा. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व एन.सी.सी. विभागातील विद्यार्थ्यांनी ही साफसफाई मोहीम राबवली. यावेळी कुंभारमाठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद भोगावकर, दुर्गेश गावकर, एन.सी.सी विभागाचे सिनिअर ऑफिसर भूषण कांबळी, रेखा कांदळगावकर व सर्व एन.सी.सी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. स्वच्छता करून झाल्यावर उपसरपंच विनोद भोगावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीरंग मंडले, कुंभारमाठ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भोगावकर यांनी या कार्याबद्दल प्रा. खोत व एनसीसी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
एनसीसी विद्यार्थ्यांकडून हुतात्मा रेगे स्मारक परिसराची साफसफाई…
