निलेश राणे यांची ग्वाही ; विशाल परब यांचा प्रयत्न कौतुकास्पद..
⚡सावंतवाडी ता.१२-: बाहेरगावी काम करणाऱ्या मुलाची सतत काळजी करणारी आई-वडील हे चित्र बदलण्याठी आपल्या जिल्ह्यातच स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणारे लोकप्रतिनिधी येथे असले पाहीजे आणि यासाठीच राजकारणात काम करत असतांना स्थानिक मुला मुलीच्या दोन हाताला काम कसे मिळेल यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न असणार अशी ग्वाही.
दरम्यान रोजगार मेळाव्यात मंडपात बसून नोकऱ्याची वाट पाहणे बंद झाले पाहिजे कारण या ठिकाणी नोकऱ्या अशा निर्माण व्हाव्यात की मंडपात बसून नोकऱ्यांची वाट बघावीच लागणार नाही. युवा मोर्चाच्या माध्यमातून विशाल परब यांनी केलेला हा रोजगाराचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे माझ्या शुभेच्छा नेहमी त्यांच्यासोबत असतील असेही श्री राणे म्हणाले.
