विद्या विहार हायस्कूलमध्ये 16 रोजी रक्तदान शिबिर…

⚡बांदा ता.१२-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. आनंद(भाऊ) पांगम यांच्या स्मृतिदिन दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दळवी, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, संजय गांधी निराधार समिती सावंतवाडी अध्यक्ष गजानन नाटेकर तसेच पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष नीलेश परब, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शिक्षक मोहन पालेकर (9422779833) यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page