राजकीय मान्यवरांकडूनही भरभरून कौतुक..
⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेच्या मनामनात अल्पावधीतच रुजलेल्या ग्लोबल महाराष्ट्र या न्यूज चैनल कडून नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशान विशाल परब आयोजित जिमखाना मैदानावरील जॉब फेअर कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थितांकडून ग्लोबल महाराष्ट्र दिनदर्शिकाचे भरभरून कौतुक करण्यात आले. त्यावेळी माजी आमदार राजन तेली
युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब,जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी नगरसेवक मनोज नाईक माजी नगरसेवक गुरु मटकर, दिलीप भालेकर केतनात गावकर ,बंटी पुरोहित, प्रभाकर परब विकास परब, तेजस माने, प्रथमेश पाटील, प्रशांत पाटील,आदी उपस्थित होते
