विशाल परब आयोजित जाॅब फेअरला सकाळ पासूनच गर्दी :थोड्याच वेळात मंत्री रविंद्र चव्हाण यांचे हस्ते होणार उद्घाटन..
⚡सावंतवाडी ता.१२-: येथील जिमखाना मैदानाच्या दिशेने हजारो तरुण तरुणींचे पाऊले वळू लागली असून विशाल परब आयोजित सिंधुरत्न जाॅब फेअरला सकाळ पासूनच नोकरीसाठी बेरोजगारांची गर्दी पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तसेच भाजप नेत्यांच्या उपस्थितीत या जॉब फेअर चे उद्घाटन होणार आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बेरोजगार युवक युवतींसाठी युवा नेते तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब याने सिंदूरत्न जॉब च्या माध्यमातून नोकरीची संधी आज जिमखाना मैदानाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे या जॉब फेअर मध्ये तब्बल 150 हून अधिक कंपन्या सहभागी झाले आहेत शिवाय मोठ्या संख्येने या जॉब फेरला युवक युवतींनी नाव नोंदणी केली आहे त्यामुळे या जॉब फेअर च्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम देण्याचा श्री परब यांचा प्रयत्न आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या जॉब फेअर चे उद्घाटन होणार आहे मात्र सकाळपासूनच युवकांची पावले या जॉब वरच्या ठिकाणी म्हणजे जिमखाना मैदानावर वळू लागले आहेत एकूणच या जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे यातून दिसून येत आहे
