तुम्ही फक्त आदर्शवाद ठेवा;तुम्ही दिलेल कार्य आम्ही यशस्वी पार पाडू…

विशाल परब यांनी दिला शब्द ; सिंधूरत्न जाॅब फेअर चे शानदार उद्घाटन..

⚡सावंतवाडी ता.१२-: साहेब ! तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा. तुम्ही दिलेले सर्व कार्य आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून यशस्वीरितीने पार पाडू असा शब्द विशाल परब यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिला. सावंतवाडी येथे आयोजित सिंधुरत्न जॉब फेअर २०२४ चे उद्घाटन आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.

यावेळी युवा नेते विशाल परब म्हणाले की, हा रोजगार मेळावा ६ महिन्यांपासून तयारी सुरू आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्ये करण्यास भाजप युवा मोर्चा आघाडीवर असेल.
आम्ही या जॉब फेअरच्या नियोजनात करण्यास कमी पडणार नाही. आजचा कार्यक्रम संध्याकाळी ६ पर्यंत असेल. वेळ पडली तर वेळही वाढवू. येथे ऑफिस सुरू करून ज्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत त्यांना भविष्यात त्या मिळवून देणार.

You cannot copy content of this page