कणकवली तालुका व्यापारी संघाने वेधले आम. नितेश राणे यांचे लक्ष..
⚡कणकवली ता.११-: राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या कणकवली उड्डाण पुलाखालील अनधिकृत व्यवसाय केंद्रे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १७ मार्च, २०२३ रोजी हटविली आणि कणकवली व्यापारी संघाला परिपूर्ण व्यवसाय करता यावा असे सकारात्मक पाऊल उचलले होते मात्र आज पुन्हा नगरपंचायत परिसरात फिरते विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून व्यवसाय करतात. यामुळे ग्राहक बाजारपेठेत पोहोचू शकत नाही. यावर तोडगा निघावा.अशी मागणी कणकवली तालुका व्यापारी संघ
तालुकाध्यक्ष दिपक बेलवलकर यांनी आम.नितेश राणे यांची भेट घेत केली.
यावेळी कणकवली तालुका व्यापारी संघ सदस्य उपस्थित होते . आम. नितेश राणे यांना सादर केलेल्या निवेदनात ते म्हणतात,
बाहेरील गांव, शहर, पेठा या मधील व्यापारी कणकवली नगरपंचायत परिसरात येऊन कमी दर्जाचा व वजनातही कमी मालाची विक्री करतात त्या संदर्भात दिलासा मिळावा,ग्रामीण भागातून येणाऱ्या विक्रेत्यांना सोईचे व्हावे म्हणून आपल्या पुढाकाराने २-३ वेळा गावठी आठवडा बाजार संकल्पना राबविली गेली, पण योग्य नियोजनाअभावी ती मृतवत झाली. कृषि उत्पन्न बाजारपेठेच्या माध्यमातून अशी योजना कार्यान्वित झाली तर त्याचा लाभ पेठेला होईल.कणकवलीचा भाजी मार्केटचा प्रश्न सुमारे २० वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे शहराला ओंगळवाणे स्वरुप प्राप्त होते यावर तातडीची कारवाई अपेक्षित. बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांच्या सोईसाठी २ किंवा ३ वाहनतळ (जरुर असल्यास पे अॅण्ड पार्क) निर्माण करण्यात यावेत.कणकवली रा.प. बसस्थानक वगळता दाट वस्ती व २ ते ३ लाखांचे फ्लोटिंग पॉप्युलेशन असूनही स्वच्छता गृहे उपलब्ध नाहीत, ती व्हावीत.
कणकवलीत २० वर्षापूर्वी एक दिशा मार्गाची अधिकृत अंमलबजावणी झाली परंतु गेले काही दिवस त्यात शिथीलता आली आहे. ही अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राबविण्यासाठी बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरा जोडणी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
नगरपंचायत हद्दीत व्यापारी भवन उभारणीसाठी ४ ते ५ गुंठे शासकीय आरक्षित जमीन उपलब्ध करून दिल्यास आभारी होऊ.
कणकवली व्यापारीसंघ ही नोंदणीकृत संस्था असून जिल्हयाच्या मध्यवर्ती सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, औद्योगिक, वैद्यकिय कणकवलीचा वारसा जोपासण्यासाठी शासन व प्रशासनाला कायम सहकार्याचा हात देण्याचे वचन देत आहे.असे म्हटले आहे.
