⚡कणकवली ता.१०-:
माऊली मित्र मंडळ, संलग्न नगरपंचायत जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाची नवीन कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आले आहे.
मंडळाच्या कार्याध्यक्षपदी राजु म्हापसेकर, संस्थापक , अध्यक्ष – राजेंद्र मनोहर पेडणेकर, उपाध्यक्ष – हेमंत नाडकर्णी, सेक्रेटरी – भगवान कासले, उपसेक्रेटरी – सचिन कुवळेकर, खजिनदार – जमिल कुरैशी, अविनाश गावडे, सल्लागार – लक्ष्मण महाडीक, विशाल रजपूत, सदस्य – अनुप्रिया खाडये, भारती फाटक, समीक्षा धुरी,प्रभाकर कदम, शिवप्रसाद घाडिगावकर, प्रसाद पाताडे, सईद नाईक, महेश मेस्त्री,लवू जैताळकर अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या, सार्वजनिक श्री सत्यनारायणाच्या महापुजे च्या दिवशी, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, पत्रकार मित्र, पोलीस बांधव, जिल्हा केंद्रातील प्रशासकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यरत कार्यकर्ते, सरपंच, व्यापारी मित्र मंडळातील जेष्ठ, तसेच कार्यक्रम स्थळी भेट देणाऱ्या महनीय व्यक्तीमत्वाचे हि सन्मान करण्यात येणार आहेत.या सर्व कार्यक्रमांसाठी सुध्दा जबाबदार जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी नेमणूक करण्यात आली आहे, असे मंडळाचे सदस्य अविनाश गावडे यांनी म्हटले आहे.
