⚡वेंगुर्ला ता.०९-: वेताळ प्रतिष्ठान आयोजित ‘अश्वमेध तुळस‘ महोत्सवांतर्गत शालेय मुली- मुलगे, व खुल्या पूरुष व महिला अशा एकूण १२ गटात घेतलेल्या जिल्हास्तरीय नव्या भविष्यासाठी भरड धान्य दौड स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे ३६८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटन मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सगुण नाईक व बॅ.खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक पुढीलप्रमाणे - १ली ते २री (मुली)-हर्षिता सकपाळ (मठ-कणकेवाडी), अदिती कांदे व साची सावंत (वजराठ नं.१), मुलगे - सर्वेश कापडी (आकेरी), भावेश खरात (गोवर्धन,वडखोल), चैत्यन परब (वजराठ नं.१), ३री ते ४थी-मुली- युक्ता राणे (पिंपळाचे भरड),
हर्षिता वेंगुर्लेकर (टोपीवाला,मालवण), माधुरी परब (वजराट नं.१), मुलगे-एकांश तुळसकर (जैतिर विद्यालय,तुळस), निहाल पेडणेकर (होडावडे), मदन परब (गिरोबा,तुळस), ५वी ते ६वी-मुली- महिमा मोहिते (मालवण), मान्यता पेडणेकर (वेंगुर्ला नं.३), श्रावणी दळवी (जनता विद्यालय,तळवडे), इ.५वी-६वी-मुलगे- गुरुनाथ मांजरेकर, ज्ञानेश गावडे (जनता विद्यालय,तळवडे), स्वराज साईकृष्ण कांदे (वजराठ नं. १), मुली-विभावरी मांजरेकर (जनता विद्यालय, तळवडे), प्रिया मसुरकर (मळेवाड हायस्कूल), अलिषा कुबल (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), ७ वी ते ८ वी-मुलगे-चिन्मय राणे, चैतन्य राणे (आडेली हायस्कूल), अथर्व राणे (वजराठ नं.१), इ ९ वी ते १०वी-मुली- आर्या कापडी (नेमळे हायस्कूल), तन्वी मुळीक (मळेवाड हायस्कूल), खुशी गिरप (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), मुलगे-यश राणे (आडेली हायस्कूल), श्रीधर गावडे (वेतोरे हायस्कूल), बाळकृष्ण राऊळ (अणसुर पाल हायस्कूल), खुला पुरुष गट – फ्रँकी गोम्स (सावंतवाडी), दीपक मुकुंद फाले (ओरस), विराज विठ्ठल गीते, खुला महिला – प्रियांका लाड (ओरस), रसिका परब (पारपोली), राजश्री पाटील (ओरस).
उद्घाटन प्रसंगी प्रा.बी.एम.भैरट, डॉ.बी.जी.गायकवाड, संजय पाटील, विवेक तिरोडकर, डॉ.सचिन परुळकर, निवृत्त पोलिस सुधीर चुडजी, प्रदीप परुळकर, महेश राऊळ, प्रसाद भणगे, सागर सावंत, किरण राऊळ, सचिन गावडे, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, केशव सावंत, यशवंत राऊळ, सानिया वराडकर, वैष्णवी परूळकर, समीर राऊळ, मंगेश राऊळ, सचिन राऊळ आदी उपस्थित होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना २१ जानेवारी रोजी मान्यवरच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात येईल.
