⚡सावंतवाडी ता.०८सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या मुलांनी तालुकास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष दाजी सावंत यांनी या यशस्वी मुलांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षक सीमा सावंत, अस्मिता गोवेकर आदी उपस्थित होते. या वाटपाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
