⚡मालवण ता.०८-: डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय मालवण आणि धैर्य वस्तीस्तर संघ बचत गट यांच्या वतीने दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी ७०३०१३४२०६ व ९४०४२१४७४५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालवणात उद्या मोफत नेत्र तपासणी शिबीर…
