सिंधू रत्न जॉब फेअरच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुण-तरूणीना रोजगाराची संधी…

अजय गोंदावळे:अधिकाधिक युवक युवतींनी संपर्क साधण्याचे केले आवाहन आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण-तरुणींना रोजगार नाही असे वारंवार बोलणारा आता विशाल परब यांच्या माध्यमातून सिंधूरत्न जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले असून त्यामुळे बेरोजगार तरूण-तरुणींना आता एक सुवर्णसंधी असून त्यामुळे अधिकाधिक युवक-युवतींने सहभाग घेऊन आपली नोकरी निश्चित करावी, असे आवाहन सावंतवाडी भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले.

दरम्यान, मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच गोवा राज्यात या नोकऱ्या मिळणार असून त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या कंपन्यांच्या ट्रॅक्टरमध्ये सहभागातून आपली नोकरी निश्चित करावी, असे अजय गोंदावळे यावेळी म्हणाले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या रोजगार मेळाव्यात अनेक बँका, मल्टी नॅशनल कंपन्या या असतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास २० हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास गोंदावळे यांनी व्यक्त केला.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगार मिळाल्या नंतर त्यांचा पुढील ६ महिन्यांसाठी फॉलोअप घेण्यात येईल.
यावेळी दिलीप भालेकर,केतन आजगावकर,दिपक पवार, नयन गुरुव किरण राहणे आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page