शिक्षकांमुळेच आमच्या सारखा तरुण घडत असतो…

भाजप युवा नेते विशाल परब:माध्यमिक शिक्षकेतर अधिवेशनाला दिली भेट…

सावंतवाडी ता.०७-: शिक्षकांमुळेच विद्यार्थी घडतात. त्यामुळे जीवनामध्ये परिवर्तन होवून जेव्हा आमच्या सारखे तरुण एका मोठ्या पदावर जाऊन समाजामध्ये वावरत असतात. त्यामागे शिक्षकांचा मोठा रोल असतो, असे गौरवोद्गार भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे काढले.

दरम्यान तुम्ही कोकणभूमीमध्ये आज आलात त्या कोकणभुमीमध्ये या दोन दिवसाच्या मेळाव्याचा संवाद व आस्वाद या कोकणचा तुम्ही घ्यायचा आहे, असे आवाहन देखील श्री परब यांनी यावेळी केले. येथील राज्य माध्यमिक शिक्षकेतर संघटनेने अधिवेशनाचे आयोजन सावंतवाडी येथे केले होते. यावेळी विशाल परब यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी परब पुढे बोलताना म्हणाले की, कोणतेही राजकीय कार्यक्रम असो इलेक्शन असो किंवा मुलांचे कार्यक्रम असो शिक्षकांबरोबर संघटनेची ताकद ही आमच्या सोबत असते. तसेच या कोकण भूमीमध्ये या संघटनेने जो मेळावा आयोजीत केला आहे ती खरच कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले. दरम्यान यापुढे देखील संघटनेला जे काय सहकार्य लागेल त्यावेळी माझ्यासारखा तरुण तुमचे नक्कीच पाठीशी उभा राहील असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेला एक लाखाची मदत देखील यावेळी जाहीर केली.
You cannot copy content of this page