भाजपाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.०६-: दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो . त्यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी झाला .तर त्यांनी दर्पण हे पहीले मराठी भाषेतील वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले . त्यामुळेच हा दिवस दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो .

दरवर्षी ह्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार पत्रकारांना देण्यात येतो . ह्यावर्षी जिल्हास्तरीय पुरस्कार वेंगुर्ले तालुक्यातील दैनिक लोकमत चे भैय्या गुरव , तसेच वेंगुर्ले तालुक्याचे कै.अरुण काणेकर स्मृती पुरस्कार प्रदिप सावंत यांना व कै.संजय मालवणकर स्मृती आदर्श पुरस्कार अजित राऊळ यांना घोषित झाला . या सर्वांचा सत्कार वेंगुर्ले पत्रकार संघाच्या कार्यालयात भाजपाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , दै.प्रहार चे दाजी नाईक , दै.तरुण भारत चे महेंद्र मातोंडकर व भरत सातोस्कर , दै.सामना चे वीनय वारंग , दै.कोकणसाद चे दिपेश परब , साप्ताहिक नवप्रभात चे योगेश तांडेल , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व मारुती दोडशानट्टी , दिलीप परब इत्यादी उपस्थित होते .

You cannot copy content of this page