महेश पांचाळ: मुख्याधिकारी यांच्याजवळ केली मागणी..
सावंतवाडी : शहरातील प्रभाग क्र.६ परिसरातील मंजूर कामे त्वरीत चालू करा व प्रस्तावित कामांची लवकरात लवकर निविदा काढून ती पूर्णत्वास न्या, अशी मागणी भाजपचे माजी तालुका सरचिटणीस महेश पांचाळ यांनी निवेदनातून नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याजवळ केली आहे.
निवेदनात असे म्हटले की, सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ६ मधील काही कामांची ठेकेदारास वर्क ऑर्डर देऊनही अद्यापपर्यंत कामे सुरु झाली नाहीत. यात शिल्पग्राम बाजूचे महादेव भाटलेकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, हॉटेल पॉम्पस ते निर्माण भवन समोरुन पाटणकर घर रस्ता डांबरीकरण करणे तसेच प्रस्तावित कामात खासकीलवाडा ज्युस्तीननगर रस्ता नुतनीकरण करणे, शिल्पग्राम समोरुन ओटवणे सार्वजनिक शौचालय पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, नवसरणी रोड, ज्यूस्तीननगर येथे उघड्या नाल्यावर स्लैब घालणे व खुल्या जागे लगतचे गटर व वॉल बांधकाम करणे, खासकीलवाडा गवस पाणंद खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मुख्य रस्त्या शेजारील गटर बांधकाम करणे, सबनीसवाडा एकमुखी दत्तमंदिर जवळील पुलाची दुरुस्तो करणे आदी कामांची निविदा काढून त्वरीत पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.
