चराठा सावंतवाडी शहराला जोडणाऱ्या ब्रीजसाठी निधी मंजूर…

ओटवणे सरपंच दाजी गांवकर यांनी पालकमंत्री चव्हाण यांचे मानले आभार..

⚡सावंतवाडी ता.०६-: चराठा गावातील सावंतवाडी शहराला जोडणारा ब्रीज गेली अनेक वर्ष प्रलंबित होते. पावसाळ्यात या पूलावर पाणी येवून चराठा गावा लगतच्या जनतेची गैरसोय होत होती. त्यामुळे याबाबत पालकमंत्री, शिक्षणमंत्री यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे ओटवणे सरपंच दाजी गावकर यांनी आभार मानले.

यावेळी ओटवणे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बूराण, चराठा उपसरपंच अमित परब, ग्रामपंचायत सदस्य अमर चराठकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील परब ,ओंकार पावसकर,आदी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page