साईलवाडा येथील विविध विकासकामांचे जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.०६-: येथील सालईवाडा प्रभाग क्रमांक 8 विविध विकास कामांची भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत झाले. मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.यात कोरगावकर घराजवळील खुली जागा विकसित करणे, सर्वेदयनगर येथील डाॅ.चिंडक यांच्या घराजवळील रस्त्याचे डांबरीकरण तसेच सुभेदार घराजवळ रस्त्याचे डांबरीकरण आदी विकास कामांची भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अनोरजीन लोबो, माजी नगरसेविका भारती मोरे, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक परिमल नाईक, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, अजय गोंदावळे, विनोद सावंत,आदी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page