⚡कुडाळ ता.०६-: सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवून मोदी सरकारच्या योजना तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन वेताळ बांबर्डे येथील भाजपच्या नूतन कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी बोलता भाजप नेते निलेश राणे यांनी केले.
वेताळ बांबर्डे पावणाई टेंब
येथे भाजप कार्यालयाचे उदघाटन भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की, या गावात कार्यालय सुरू केले असला तरी हे कसे चालवावे हे मला तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही. जनसेवा डोक्यात ठेवून या कार्यालयातून काम झाले पाहिजे. या कार्यालयातून दर्जेदार काम होईल याची मला कोणताही शंका नाही.
निलेश राणे म्हणाले की, सत्तेमध्ये असताना सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वाधिक अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून असतात. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मी पाठवलेले कोणतेही काम नाकारलेले नाही. या उलट त्यांनी मी पाठवलेल्या प्रत्येक कामाला कसा न्याय देता येईल हे पाहिले. त्यामुळे आपल्याला अनेक वर्षानंतर असे काम करणारे चांगले पालकमंत्री लाभले आहेत. या आधी जिल्हा नियोजनमधून आपल्याला पैसा दिला जात नव्हता. तर याला आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दुजोरा देत खरेच याआधीही पैसा आला नाही असे म्हटले आहे. त्यामुळे आमदारच मान्य करत आहेत की, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पैसा आला नाही, अशी टीका निलेश राणे यांनी यावेळी केली. तर कुडाळ-मालवण मतदारसंघ मला महाराष्ट्रातील उत्तम मतदारसंघ बनवायचा आहे. तर कार्यकर्ता म्हणून अवधूत सामंत यांच्याबद्दल माझ्या मनात वेगळ्या भावना आहेत तर त्यांच्याही मनातील भावना मी समजू शकतो, असे निलेश राणे यांनी सांगत कार्यकर्ता म्हणून अवधूत सामंत यांचे कौतुक केले. यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, दीपक नारकर, श्रीपाद तवटे, रुपेश कानडे, आनंद शिरवलकर, बूथ अध्यक्ष निलेश बांबर्डेकर, अरविंद बांबर्डेकर, भास्कर गावडे, दशरथ कदम, अवधूत सामंत, देवेन सामंत यांच्यासह महिला पदाधिकारी संध्या तेरसे, प्राजक्ता बांदेकर, दीपलक्ष्मी पडते, प्रणाली घाडी आदी गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार रुपेश कानडे यांनी मानले.
