भालचंद्र महाराज संस्थान आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा 7 जानेवारी रोजी…

⚡कणकवली ता.०५-: परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा रविवार 7 जानेवारी रोजी कणकवली कॉलेज व कळसुलकर हायस्कुल सावंतवाडी या दोन केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले असून परीक्षा सकाळी 10.30 वा. ते दुपारी 3 वा. या वेळेत होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांक यादीत परीक्षा केंद्रांवर सकाळी लावण्यात येणार आहे. तरी सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्यांनी वेळीच परीक्षा केंद्रांवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page