उद्योजक भैया सामंत यांचे सावंतवाडीत बॅनर ; लोकसभेच्या निवडणुकीआधी बॅनरबाजीमुळे उमेदवारीबाबत चर्चेला उधाण..
⚡सावंतवाडी ता.०५ प्रसन्न गोंदावळे-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन टेपली असतांनाच सावंतवाडी शहरात आज उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागल्याने लोकसभेचा उमेदवार हा किरण सामंत हेच असल्याचे काहीअंशी पुढे आले आहे. किंग मेकर नव्हे आता फक्त किंग अशा आशयाबरोबर एकच लक्ष मिशन दिल्ली असा उल्लेखही बॅनरवर करण्यात आला आहे. त्यामुळे हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाघ लागले आहे यातच शिवसेना भाजप राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग चा उमेदवार कोण याबाबत अजूनही मतमतांतर सुरू असतानाच भैय्या सामान्यांनी दोन दिवसापूर्वीच भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास आपला पाठिंबा असल्याचेही सूतोवाच केले होते एकूणच यावरून राजकीय समीकरणांना मोठा वेग आला होता लोकसभा निवडणुकीसाठी अनेक चेहरे इच्छुक आहेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही वरिष्ठांनी संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवेल असे जाहीर वक्तव्य केले होते त्यात दोन दिवसापूर्वी सावंतवाडीमध्येच उद्योग मंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प सभेचे नियोजन बैठक पार पडली होती यामध्ये शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी असे रणसिंग फुंकण्यात आले होते. एकूणच या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आज चक्क सावंतवाडी शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी उद्योजक भैया सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागल्याने सगळ्यांच्या नजरा वठारल्या आहेत. फक्त बॅनरच नव्हे तर त्यामधील असेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे एकूणच या बॅनरबाजीमुळे लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्याबरोबरच उमेदवारी ही भैय्या सामान यांनाच देण्यात येणार असल्याचे आता बोलले जात आहे.
