श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या दिनदर्शिका २०२४ चा प्रकाशन…

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठात श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या साईलीला दिनदर्शिका २०२४ चा प्रकाशन सोहळा बांदा शहराच्या सरपंच प्रियांका नाईक, व भारतीय जनता महीला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यानी मान्यवराचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे खजिनदार राजेश कारेकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, सल्लागार ज्ञानेश्वर केसरकर, सदस्य साईराज साळगावकर, साईशकुमार केसरकर, प्रितेश केसरकर, प्रितम हरमलकर, सौ. दर्शना केसरकर, सौ. राजश्री तेंडले, उत्सव कमीटी सदस्य राज हरमलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. श्रेया केसरकर, सौ. प्रिया केसरकर, अंकुश माजगावकर, बंटी आमोणेकर, सतीश नाटेकर, सौ. स्नेहा नाटेकर, सौ. उमांगी मयेकर, विजय कासार आदी उपस्थित होते. श्रीमती नाईक यांनी यावेळी मंडळाच्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले. सौ. कोरगावकर यानी केसरकर कुटुंबीयानी जोपासलेल्या साई तसबीरी जपवणुकीबाबत कौतूक केले. सुत्रसंचालन व प्रास्तावीक राकेश केसरकर यानी केले आभार साईराज साळगावकर यानी मानले.

You cannot copy content of this page