तोंडवळीच्या मिनी पर्ससीनला एक लाखाचा दंड…

⚡मालवण ता.०५-: मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबण्याचा इशारा देऊनही तोंडवळी समुद्रातून आचरा येथे पळ काढणाऱ्या तोंडवळी येथील गंगाराम कृष्णा पाटील याच्या हेरंभ १ (क्र. IND-MH- 5-MM-3323) या मिनी पर्ससीनला सहाय्यक आयुक्त (मत्स्य व्यवयाय) यांनी १ लाख रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेचा भरणा केल्यानंतर मीनी पर्ससीन नौका मालकाच्या ताब्यात देण्यात आली.

दि. १८ डिसेंबर रोजी मत्स्य विभागाचे अधिकारी सागरी गस्त घालत असताना तोंडवळी येथील गंगाराम कृष्णा पाटील याच्या हेरंभ १ (क्र. BIND- MH-5-MM-3323) मिनी पर्ससीन नौकेवर पर्ससीन जाळे असल्याचे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिनी पर्ससीनधारकाला थांबण्याचा इशारा केला. परंतु मिनी पर्ससीनधारकाने आचरा समुद्राच्या दिशेने पळ काढला. मत्स्य विभागाच्या शितल गस्ती नौकेने मिनी पर्ससीनचा पाठलाग करून ही नौका ताब्यात घेतली होती. या नौकेवर सागरी कायद्यान्वये सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय श्री. स. अलगिरी यांच्याकडे प्रतिवेदन दाखल करण्यात आले होते. त्यानुसार ही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page