⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडीचा सुपुत्र निखिल नाईक याची रणजी सामन्यासाठी महाराष्ट्र संघाकडून निवड झाली आहे. आज पासून सुरू झालेल्या मणिपूर विरुद्धच्या सामन्यात त्याचे रणजी मध्ये पदार्पण झाले आहे निखिल नाईक हा यापूर्वी आयपीएल मध्ये खेळला होता कोलकत्ता नाईट रायडर कडून त्याने आयपीएल मध्ये पदार्पण केले होते आता त्याने रणजी सामन्यात चमक दाखवल्यात त्याची भारतीय संघाचे दरवाजे खुले होऊ शकतात. सावंतवाडीतील सुनील नाईक प्रतिष्ठान संचलित समर्थ क्रिकेट अकॅडमीचा हा खेळाडू असून या अकॅडमीने त्याचे अभिनंदन केले आहे
सावंतवाडीचा सुपुत्र निखिल नाईक याची रणजी सामन्यासाठी महाराष्ट्र संघाकडून निवड…
