सिंधुरत्न जाॅब फेअर मध्ये सहभागी होण्यासाठी युवक युवतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

अनेकांनी क्युआर कोड व ऑफलाईन पद्धतीने केला आपला सहभाग निश्चित :मोठ्या संख्येने सहभाग दर्शवा विशाल परब यांचे आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०४-: भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी जिमखाना मैदानावर 12 जानेवारी रोजी होणाऱ्या सिंधू रत्न जाॅब फेअर २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक युवतीचा प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत अनेकांनी क्युआर कोड व ऑफलाईन पध्दतीने फाॅर्म भरुन आपला प्रवेश निश्चित केला आहे. तरी जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतीनी या जाॅब फेअरची संधी उपलब्ध करुन घ्यावी असे आवाहन श्री विशाल परब यांनी केले आहे.

तब्बल 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांचा सहभाग असलेल्या या जॉब फेअर मध्ये पाचवी पास ते पदवीधर झालेल्या प्रवेश घेता येणार आहे तसेच दिव्यांग उमेदवारांनाही या जॉब वर मध्ये सहभागी होता येणार आहे ज्यांना नोकरी मिळाली नाही अशा उमेदवारांना जॉब कार्डचे वाटपही यावेळी करण्यात येणार आहे सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात विभाग युवतींनी या जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफलाइन आणि क्यूआर कोड च्या माध्यमातून आपला सहभाग निश्चित केला आहे ज्यांना कोणाला प्रत्यक्ष फॉर्म भरता येऊ शकत नाही यांनी क्यूआर कोड स्कॅन करून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे असे आवाहनही श्री परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page