विरोधी गटनेते सुशांत नाईक यांची मागणी
कणकवली : शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय सामाजिक व आर्थिक केंद्रबिंदू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला असतानाच, कणकवली शहर गेली काही वर्षे पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यापासून दूर राहिले आहे. त्यामुळे कणकवली शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा याकरिता कणकवली शहरातील जानवली नदीलगत असलेल्या गणपती साना येथे सुसज्ज असे गार्डन व गणपती साना व जानवली नदीकाठचा परिसर सुशोभिकरण व पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याकरिता तीन कोटींचा निधी कणकवली शहराला देण्यात यावा. कणकवली नगरपंचायत गटनेता व कणकवली शिवसेना यांच्या वतीने आपल्याकडेही मागणी करण्यात येत असून, कणकवली चा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास त्याचा शहरालाही फायदा होणार आहे. तसेच गेली काही वर्षे पर्यटनदृष्ट्या अविकसित राहिलेले शहर यामुळे विकासाच्या दृष्टीने प्रकाश झोतात देणार आहे. तरी या संदर्भात कणकवली शहरातील जनहिताच्या दृष्टीने पर्यटनदृष्ट्या शहर विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी विरोधी गटनेता सुशांत नाईक यांनी केली आहे.
