सावंतवाडी : माडखोल मधलीवाडी येथे विहिरीच्या रहाटाला एका वृध्द व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शांताराम महादेव राऊळ (वय 80) असे त्यां वृध्द व्यक्तीचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून त्या वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. माडखोल मधलीवाडी येथे राऊळ यांच्या घरापासून सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीच्या रहाटाला असलेल्या दोरीच्या साहाय्याने राऊळ यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शेजाऱ्यांनी विहिरीच्या रहाटाला अडकून पडलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात राजन बाळकृष्ण राऊळ यांनी माहिती दिली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
राहाटाला असलेल्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
