कणकवली ग्रामीण २ शाखे अंतर्गत १ कोटी ८६ लाख वीज देयक थकबाकी
*💫कणकवली दि.१६-:* वीज वितरणच्या कणकवली ग्रामीण २ शाखे अंतर्गत १ कोटी ८६ लाख वीज देयक थकबाकी आहे. तालुक्यात महावितरणकडून थकीत वीजदेयक वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. कणकवली ग्रामीण २ शाखा कार्यालय अंतर्गत प्रत्येकी रुपये २ हजारच्या वर थकबाकी असलेले १६३१ ग्राहक आहेत. त्यांची एकूण थकबाकी १ कोटी ८६ लाख असल्याने वीज ग्राहकांनी आपली वीज बिल भरुन महावितरणला सहकार्य करावे,अन्यथा नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित केला जाईल,असा इशारा सहाय्यक अभियंता श्रीराम राणे यांनी केले आहे. त्यात कलमठ अंतर्गत ७०६ ग्राहकांची ८५.५४ लाखांची वीज देयक थकबाकी आहे.जानवली गावातील २३० ग्राहकांची २८.७५ तर वरवडे गावातील १६ ९ ग्राहकांची २३.१२ लाख थकबाकी आहे.शाखा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या इतर ८ गावात ५२६ ग्राहक थकबाकीदार असून त्यांची रक्कम ४ ९ .२१ लाख आहे.या ग्राहकांमध्ये घरगुती , वाणिज्यिक , औद्योगिक , सार्वजनिक नळयोजना , स्ट्रीटलाईट ग्राहकांचा समावेश आहे.सध्या वीज वितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून अपेक्षित वीज देयक वसुली न झाल्यास साहजिकच त्याचा परिणाम पावसाळ्या पूर्वीच्या व पावसाळ्यातील वीज वितरणच्या डागडुजी वर होणार आहे.सर्व ग्राहकांनी आपली थकीत देयके भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे व आपला वीज पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी , असे आवाहन सहाय्यक अभियंता श्रीराम राणे यांनी केले आहे .
