⚡सावंतवाडी ता.०३-: गोवा येथील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञाती बांधवांचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्गातील भोगवे येथील कृषी आयडॉल दादा सामत होते त्यांच्यासोबत व्यासपीठावर गोवा येथील ॲडिशनल कलेक्टर सौ स्नेहल सामंत उपस्थित होत्या यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा व विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला व नवीन वर्षानिमित्त कुडाळदेशकर दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना दादा सामान म्हणाले पर्यावरण औषधी वनस्पती आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी स्पर्धा व देश-विदेशातील न्याती बांधवांनी एकत्र कसे यायचे याबाबत विवेचन केले तसेच मुलींचा शेतकरी नवरा म्हणून शेती उद्योजकाला मिळत असलेली नापसंधी कसे दूर करायचे या संबंधित सविस्तर विश्लेषण केले कृषी सन्मान यांनी मोठमोठ्या बागायतदारांना भेट देऊन वशिष्ठ पूर्ण कामाची पाहणी केली संमेलनाला शेकडोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.
