१९ ते २१ मार्च रोजी आयोजन; खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
*💫वेंगुर्ला दि.१६-:* सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेना यांच्यावतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रीमिअर लीग २०२१ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दिनांक १९, २० व २१ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वेंगुर्ला कॅम्प येथील मैदानावर आयोजित करण्यात आली असून विजेत्या संघाला रोख रुपये ५१ हजार व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला रोख रुपये ३१ हजार व आकर्षक चषक, तृयीय व चतुर्थ संघाला विभागून प्रत्येकी रोख रुपये १० हजार व आकर्षक चषक तर स्पर्धेतील मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक व प्रत्येक सामन्यातील सामनावीर यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. दरम्यान या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ठीक ९ वाजता आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, गितेश राऊत, रुची राऊत तसेच जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर या स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवार दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी ४ वजता खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, शिवसेना नेते अतुल रावराणे, बाप्पा मांजरेकर, युवासेना जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर, युवासेना जिल्हा अधिकारी मंदार शिरसाट, यांच्यासाहित शिवसेना नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला असुन क्रीडा रसिकांना ही स्पर्धा यु ट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. तरी याचा क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख आबा कोंडास्कर यांनी केले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, शहर समन्वयक विवेक आरोलकर यांच्या सहित इतर पदाधिकारी उपस्थित होते.
