वेंगुर्ला भाजप युवा मोर्चाची मागणी; तहसीलदारांना निवेदन सादर…
⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला तालुक्यातील ब-याच रेशन दुकानावर डिसेंबर महिना संपत आला तरी धान्य उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना रेशन धान्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. तरी तत्काळ धान्य उपलबध करून देण्यात यावे, अशी मागणी वेंगुर्ला तालुका भाजप युवा मोर्चाच्यावतीने वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी हेमंत गावडे, प्रणव वायंगणकर, हितेश धुरी, भूषण आंगचेकर, सुधाकर आंगचेकर, कृष्णा सावंत, विष्णू परब, सागर राणे, रविद्र शिरसाट, कमलेश गावडे यांच्यासह भाजप युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
