सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर काका कुडाळकर व प्रफुल्ल सुद्रिक…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली संधी

⚡कुडाळ ता२७-: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा विशेष निमंत्रित नियोजन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, युवकचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक आणि जेष्ठ पदाधिकारी सावळाराम अणावकर यांचीही जिल्हा विशेष निमंत्रित नियोजन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

याबाबतचा अध्यादेश नियोजन विभागाचे उपसचिव नितीन खेडकर यांनी जारी केला आहे.
राज्यात महायुती सरकार असून
काका कुडाळकर हे कार्याध्यक्ष तर अबिद नाईक हे जिल्हाध्यक्ष म्हणून पदावर आहेत.

You cannot copy content of this page