मंत्री दीपक केसरकर: सिंधू रत्न योजनेतून रेलटेलसाठी निधी देणार..
⚡सावंतवाडी ता.२५-: रेल्वे प्रवासी संघटनेच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मुख्यमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावणार अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान सिंधुरत्न योजनेतून टर्मिनलची इमारत व केंद्र पर्यटन सुविधा केंद्र उभारणार असल्याच देखील श्री केसरकर यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी मंत्री दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आज आपल्याशी चर्चा केली या चर्चे दरम्यान टर्मिनसची प्रश्न कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता टर्मिनसच्या इमारतीसाठी पर्यटन केंद्र करिता लागणारा निधी देऊन यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे.
दरम्यान त्यांच्या आराखड्यानंतर निधी उपलब्ध करून दिला जाणार असून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस येथे प्रवासी सुविधा पर्यटन केंद्र टर्मिनल शेजारी उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या इमारतीच्या खाली कार्यालय आणि वरच्या मजल्यावर पर्यटन सुविधा केंद्र उभारणार असल्याचे श्री नामदार दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान याच ठिकाणी रेल टेल उभारले जाईल या रेलटेल साठी चांदा ते बांदा योजनेतून निधी मंजूर करून देण्यात आला आहे. रेल्वे टर्मिनल साठी लागणारे पाणी तिलारीच्या कालव्यातून देण्यात येणार असून जीवन प्राधिकरण मधून हे पाणी टर्मिनल साठी देण्यात येणार आहे अशी माहिती देखील श्री केसरकर यांनी दिली.
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस अन्या गाड्या थांबवण्याबाबत रेल्वे मंत्रालयाचे रेल्वे राज्यमंत्री श्री दानवे यांच्याशी चर्चा करणार असून लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न सोडवला जाणार आहे अशी माहिती देखील श्री केसरकर यांनी यावेळी दिली.
दरम्यान सावंतवाडी टर्मिनसल रेल्वेचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री कैलासवासी मधु दंडवते यांचे नाव देण्याबाबत ठराव कॅबिनेट मध्ये पास करीत होता मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देणार. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वाहतूक रेल्वे खाते यांचे समन्वयक असल्याने यांच्या समावेश जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बैठक बोलावून कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्या पूर्ण करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला.तसेच तूर्ता शक्य होईल तेवढ्या रेल्वे गाड्या थांबा देणार असून वंदे भारत साठी यापूर्वीच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे.असे श्री केसरकर यावेळी म्हणाले.
