इन्सुली येथे सुरू असलेले वीज वितरणचे काम स्थानिक ग्रामस्थांनी रोखले…

ठेकेदाराकडे संबंधित विभागाची परवानगी नसतानाही काम सुरु असल्याने ग्रामस्थ आक्रमक:उपोषण छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा..

⚡बांदा ता.२४-: वीज वितरण विभागाचे पाटबंधारे विभागाच्या इन्सुली माडभाकर कालव्यावरून सुरू असलेले काम स्थानिक ग्रामस्थांनी रोखले. ठेकेदाराकडे संबंधित विभागाची परवानगी नसतानाही बिनधास्तपणे लाइनचे काम करत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. कालव्याच्या व महामार्गाच्या नजीक आमच्या जमिनी असून या कालव्याला सुद्धा आमच्या जमिनी गेल्या आहेत त्यामुळे याठिकाणाहून लाइन टाकायला आम्ही देणार प्रसंगी आम्ही संबंधित विभागासमोर उपोषण करू असा इशारा यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला.
इन्सुली माडभाकर वाडीतून तिलारी विभागाचा कालवा जातो. सद्यस्थितीत या कालव्यावरून उच्च दाबाच्या वीज लाइन टाकण्याचे काम सुरू होते मात्र काम सुरू झाल्याचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आम्ही जमिनी कवडीमोल दराने पाण्यासाठी दिल्या मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेता संबंधित विभाग जर त्या जमिनी परस्पर देत असेल तर आमचा त्याला विरोध आहे असे सांगत काम करणाऱ्या ठेकेदाराला काम बंद करण्यास सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ता खडपकर, साईप्रसाद राणे, शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख आपा आमडोसकर, हेमंत नाईक, कांजी राणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सुरवातीला ठेकेदार यांनी या कामाची परवानगी आहे असे सांगितले मात्र त्यानंतर परवानगी दाखवा असे सांगितल्यावर परवानगी नसल्याचे कबूल केले. यावर खात्री करण्यासाठी ग्रामस्थ साईप्रसाद राणे यांनी तिलारी विभागाशी संपर्क केला. व जाब विचारला तुम्ही विजवितरणला लाईन घालण्यासाठी परवानगी द्या. फक्त या लाईनमुळे कोणतीही जीवितहानी, बागायती जळून खाक झाल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार याची लेखी हमी द्या असे स्पष्ट सांगितले. तर आपा आमडोसकर यांनी आम्ही जमीनी पाणी येणार म्हणून दिल्या तुम्हाला लाइन घालण्यासाठी दिल्या नाही असे ठेकेदाराला सुनावले.
याबाबत पाटबंधारे विभाग व महामार्ग विभागाला ग्रामपंचायत मार्फत पत्र देऊन अश्या कामाना परवानगी देऊ नये असे सूचित करूया असे ग्रामपंचायत सदस्य दत्ता खडपकर यांनी दिल्या.यावेळी सदरचे काम बंद करण्यात आले असून संबंधित विभागाने ते काम सुरू केल्यास आम्ही उपोषण करणार असल्याचे साईप्रसाद राणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page