विकासाचे माॅडेल म्हणून हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा-: संजय पडते

⚡कुडाळ ता.२४-: हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत ही विकासाचे मॉडेल म्हणून राज्यात पाहिली जाते. त्यामुळेच अतुल बंगे आणि अर्चना बंगे या दांपत्याने हुमरमळावासियांचा विश्वास संपादन केल्यानेच पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर सरपंच अमृत देसाई यांच्या रुपाने नवतरुण सरपंच या गावाने निवडून दिल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी हुमरमळावासियांचे आभार मानले. हुमरमळा (वालावल) येथील महिला बचतगटांच्या सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित सरपंच अमृत देसाई, उपसरपंच रश्मी रमाकांत वालावलकर आणि ग्रामपंचायत सदस्य हेमांगी हेमंत कद्रेकर यांचा सन्मान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना संजय पडते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरमळा (वालावल) ही एकमेव ग्रामपंचायत असून ती सर्वसामान्य योजना लोकांपर्यंत पोहचविते आणि विकासाचे मॉडेल म्हणून राज्यात नावलौकिकप्राप्त आहे. अशा या ग्रामपंचायतींवर पुन्हा हुमरमळावासियांनी विश्वास दाखवून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भगवा ग्रामपंचायतीवर फडकला आहे. अतुल बंगे आणि अर्चना बंगे यांच्या कार्याची पोचपावती तुम्ही दिल्याबद्दल संजय पडते यांनी हुमरमळावासियांचे आभार मानून सरपंच अमृत देसाई, उपसरपंच रश्मी वालावलकर, सदस्या हेमांगी कंद्रेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, सुरेंद्र तावडे, चंद्रशेखर करलकर, मानसी वालावलकर, निकिता वालावलकर,सोनाली मांजरेकर, अर्चना बंगे, प्रतीक्षा परब, शिल्पा मयेकर, इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page