पिंगुळी येथून गोवा बनावटीची दारू जप्त…

कुडाळ पोलिसांच्या कारवाई: ४५ हजाराची दारू जप्त..

⚡कुडाळ ता.२३-: पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे कुरा पोलिसांनी छापा टाकून ४५ हजार २०० रू.किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी संदीप चंद्रकांत गावडे व 38 रा. पिंगुळी नवीवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई कुडाळ पोलिसांनी शनिवारी दुपारी बारा तीस वाजता केली.
या प्रकरणी पोलीस स्वप्निल जगन्नाथ चव्हाण यांनी कुडाळ पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. यानुसार कुडाळ पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कुडाळ पोलीस स्टेशन येथील पोलीस कृष्णा परुळेकर स्वप्नील चव्हाण व दयानंद चव्हाण यांनी पिंगुळी म्हापसेकर येथील सिद्धिविनायक कोल्ड्रिंक च्या पाठीमागील मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी तेथे असलेला संदीप चंद्रकांत गावडे याच्या कडील सिमेंटच्या पिशवीची पोलिसांनी तपासणी केली. यावेळी पोलिसांना दारूच्या बाटल्या मिळून आल्या. यामध्ये बुलेट ७७, ओल्ड कॅशु फेनीच्या १६ हजार ८०० रू.किंमतीच्या ८४ बॉटल, हायवर्ड, फाईन विस्की १४ हजाराच्या ७० बॉटल्स, बॉबस लेमन व्होडका ९ हजार ६०० रू.किमंतीच्या ४८ बॉटल्स, ४ हजार ८०० रू किंमतीच्या देशी दारू टेंगोच्या ४८ बॉटल्स असा ४५ हजार २०० रू.किंमतीचा दारू मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संदीप गावडे याला दारूसह ताब्यात घेत महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

You cannot copy content of this page