धुरीवाडा येथील साई मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.२३-: मालवण शहरातील धुरीवाडा साईनगर येथील साई मंदिरच्या ३३ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दि. १८ डिसेंबर पासून मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेले पाच दिवस मंदिरात साई सगुण पूजा, साई सतचरित्र पारायण, साई नैमित्तीक पूजा, साई दुग्धाभिषेक, रुद्र याग, भजन डबलबारी आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले.

यानिमित्त दि. २४ रोजी सकाळी ६.३० वाजता साई नैमित्तिक पूजा, ७ वाजता साई दुग्धाभिषेक, सायंकाळी ४ वाजता साई पादुका पालखी मिरवणूक होईल. २६ रोजी सकाळी ६.३० वाजता साई सगुण पूजा, ७ वाजता साई दुग्धाभिषेक, ११ वाजता सामुदायिक सत्यनारायणाच्या महापूजा, १.३० वाजता महाप्रसाद भंडारा, सायंकाळी ६.४५ वाजता साईंची महाआरती, ७ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले यांचे दैव किती अविचारी हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. याच दिवशी दत्त जयंती सोहळाही होणार आहे. २७ रोजी रात्री ९ वाजता सुभेदार हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page