नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचे नाव द्यावे…

दिपाली भालेकर: मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली निवेदनद्वारे मागणी..

⚡सावंतवाडी ता.२३-: येथील नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नव्याने व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात यावे तसेच त्यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आज माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनद्वारे केली.यावेळी शिंदे सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. नीता सावंत कविटकर उपस्थित होत्या.

निवेदनात भालेकर यांनी म्हटले की, सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली संत गाडगेबाबा महाराज भाजी मंडईची इमारत जुनी झालेली असल्याने पाडण्यात आली असून सदर इमारतीच्या पुनर्बाधणीचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.


सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा महाराज भाजी मंडईची इमारत ही जुनी व संस्थानकालिन इमारत होती. संत गाडगेबाबा महाराज यांच्या सावंतवाडी शहरातील वास्तव्यामुळे सदर मंडईस गाडगेबाबांचे नांव देण्यात आले होते. सदर मंडईच्या ठिकाणी गाडगेबाबा भजन, किर्तन करुन लोकप्रबोधनाचे बहुमोल समाजकार्य करत असत. तसेच त्यांनी स्वच्छतेचा मुलमंत्र दिला होता. नवीन भाजीमंडईचे बांधकाम झाल्यानंतर पूर्वीचेच नांव सदर इमारतीस देण्यात यावे, तसेच सदर इमारतीलगतच्या परिसरात संत गाडगेबाबा महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी भालेकर यांनी केली.

You cannot copy content of this page