मंत्री दीपक केसरकर यांची माहिती; माठेवाडा येथील मारुती मंदिर शेड पुनर्बांधणीचा शुभारंभ..
⚡सावंतवाडी ता.२३-: यंदाच्या नव्या वर्षात सावंतवाडीत पर्यटन महोत्सव होणार याबाबतची माहिती मंत्री दीपक केसरकांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान येथील माठेवाडा येथील अतिवृष्टीमुळे अश्वत्थ मारुती मंदिर,खत विक्री केंद्र शेजारील मंदिराच्या शेडचं नुकसान झाले होते. ते पुनर्बांधणीसाठी आज मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पाच लाखाचं अष्टिमिट करण्यात आले आहे यावेळी श्री. केसरकर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी विकास गोवेकर,मंगेश चिटणीस,जितेंद्र सावंत,संजय चिटणीस,बबलू मिशाळ,सुधीर आडिवरेकर,किशोर चिटणीस,मेहर पडते, संदिप निवळे,प्रथमेश प्रभू,साईराज नार्वेकर,महेश बांदेकर,नागेश जगताप व माठेवाडा येथील रहिवासी उपस्थित होते
