Headlines

आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव-शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश…

⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: निरवडे येथे झालेल्या मळगाव केंद्रस्तरीय स्पर्धां पाठोपाठ सोनुर्ली येथे झालेल्या आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध सांघिक व वैयक्तिक मैदानी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या स्पर्धांना सुद्धा विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

लहान गटात झालेल्या समूह नृत्य स्पर्धेत शारदा विद्यालयाच्या मुलींनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच खो-खोमध्ये मुलांनी प्रथम क्रमांक तर कबड्डीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. वैयक्तिक स्पर्धांत ओम मदन शिरोडकर याने लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक तर उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच लांब उडीमध्ये दशरथ पंढरीनाथ गावकर याने द्वितीय क्रमांक तर ५० मीटर धावणे खेळात तृतीय क्रमांक प्राप्त केला. खो-खो, लांब उडी, उंच उडी, समूह नृत्य स्पर्धेतील हे सर्व विद्यार्थी तालुका पातळीवर होणाऱ्या स्पर्धात खेळणार आहेत. उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, सच्चीदानंद मेस्त्री, माधवी शिरोडकर, विजय ठाकूर, शिक्षक पालक सदस्य, पालक आनंद शिरोडकर, अनुष्का शिरोडकर, मदन शिरोडकर, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना , शिक्षकांचे पालकांचे, मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page