संजय गांधी प्रकरणे निर्गमित करा…

शिंदे शिवसेनेची मागणी: तहसीलदारांना निवेदन सादर..

⚡सावंतवाडी ता.२२-: संजय गांधी विभागातील नियोजीत लाभार्थ्यांची प्रकरणे त्वरीत निगर्मित करण्यात यावी अशी मागणी शिंदे शिवसेनेने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.दरम्यान आवश्यक असलेला निधी केंद्र सरकार कडून उपलब्ध होवून सुध्दा सावंतवाडीतील राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत.

याबाबत खुद्द सत्ताधारी गटातील शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी हा प्रकार तहसील प्रशासना समोर उघड केला आहे.व वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी तात्काळ प्रयत्न व्हावेत अशी मागणी तहसीलदारांकडे केली.

यावेळी शिंदे गटाचे महिला आघाडी जिल्हाप्रमुख आणि नीता कवीटकर, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, गजानन नाटेकर,विनायक सावंत, मंगलदास देसाई, संजय पालेकर, रवी परब, रेशमा नाईक,संदेश सोनुर्लेकर,महेश सावंत ,रघुनाथ नाईक ,एकनाथ हळदणकर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page