निरवडे आरोस तिठा ते न्हावेली आरोस रस्ता खड्डेमय असल्याबाबत वेधले लक्ष..
सावंतवाडी : निरवडे आरोस तिठा ते न्हावेली आरोस बाजार मार्ग रस्ता खड्डेमय असल्याबाबत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता वैभव सगरे यांची भेट घेतली लक्ष वेधले.
यावेळी न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संदेश सावंत यांनी निवेदन देत लक्ष वेधले, मागील काही दिवसात त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार व बरेच अपघात झाल्याचे निदर्शनास आणून दिले, तर काही ठिकाणी खडी वर आल्याने गाडी चालविणे त्रासदायक ठरत आहे, याबाबतही लक्ष वेधले. तर अभियंता वैभव सगरे यांनी या कामाच्या टेंडरचे काम चालु असून येत्या पंधरा दिवसात काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे आश्वासन उप अभियंता श्री सगरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी मनविसे जिल्हा सचिव नीलेश देसाई, तालुका सचिव मनोज कांबळी, मनविसे विभाग अध्यक्ष श्री चेतन पार्सेकर, गिरगोल दिया, राज धवण, हेमचंद्र सावळ, अमोल पार्सेकर, प्रथमेश नाईक, नवनाथ पार्सेकर आदी उपस्थित होते. तर येत्या पंधरा दिवसात काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.
