कोकण धनाने श्रीमंत होण्यासाठी अणुऊर्जा,रिफायनरी प्रकल्पांची आवश्यकता…

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर; मोठ्या प्रकल्पामुळे रोजगाराबरोबरच कोकणची प्रगती साधता येईल

सावंतवाडी ता.२०-:कोकण मनाने श्रीमंत आहेच परंतु धनाने श्रीमंत होण्यासाठी अणुऊर्जा रिफायनरी यासारख्या मोठ्या प्रकल्पाची या ठिकाणी आवश्यकता आहे असे प्रकल्प इथे आल्यास रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच कोकणची प्रगती होऊ शकते असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.


सावंतवाडीत बुधवारी यशवंतराव भोसले नॉलेज सिटी मध्ये डॉ. माशेलकर यांच्यासोबत नागरिकांची चाय पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आली होता त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता ते बोलत होते.
कोकणात होणाऱ्या अणुऊर्जा आणि रिफायनरी प्रकल्प संदर्भात ते म्हणाले असे प्रकल्प कोकणात होणे आवश्यक आहे यातून रोजगार मिळू शकणार आहेत असे मोठे प्रकल्प आल्याशिवाय रोजगाराची किंबहुना कोकणची प्रगती होऊ शकणार नाही प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प भविष्यात काळाची गरज आहे.

You cannot copy content of this page