युवा सेनेचे विभागप्रमुख व उपविभागप्रमुखांचे राजीनामे:ठाकरे सेनेत राजीनामाचे सत्र सुरूच…
⚡सावंतवाडी ता.२०-: वेत्ये सरपंच तसेच ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुणाजी गावडे यांनी आपला पदाचा दुपारीच राजीनामा देण्याचा ठरवल असतानाच आता आंबोली विभागातून युवा सेनेचे विभागप्रमुख व उपविभागप्रमुख मायकल डिसोजा व अजित नार्वेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याच ठरवल आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे आंबोली विभागातदेखील ठाकरे सेनेला मोठा खिंडार पडणार आहे.
दरम्यान ठाकरे सेनेत घडलेल्या या नाट्य घडामोडी नंतर वरिष्ठ नेते आता काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले असून तसेच आज दिलेले तिघे ठाकरे सेनेचे पदाधिकारी हे आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची देखील उत्सुकता आता सर्वांना लागून राहिले तसेच आणखी काही जण देखील राजीनामा देण्याची तयारी असल्याचे देखील चर्चा सुरु आहे.
